बनगाव येथे अतिक्रमण हटाव मोहीम

0
12

आमगाव,दि.14: तालुक्यातील सर्वात मोठे गणल्या जाणारे चिकन-मटन मार्केटमधील वेस्टेजमुळे नागरिकांना विविध आजारापासून त्रास सहन करण्याची वेळ आली होती.सोबतच अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या.ग्रामपंचायतीकडे वारंवार स्वच्छतेसाठी पाठपुरावा करुनही स्व्च्छता होत नसल्याचे बघत नागरिकांनी सरळ आयुक्तालाच तक्रार केली.आणि या परिसरातील चिकन-मटन मार्केट बंद करण्यासाठी पुढाकार घेतला.अखेर याची दखल घेत बनगाव ग्रामपंचायत व बाजार समितीने दुकानांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम आयुक्तांच्या निर्देशनांतर गुरुवारी हाती घेतली.या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलिसांसह महसुल विभागाचे अधिकारीही प्रामुख्याने हजर राहिले.आमगाव येथील बाजार समितीच्या हद्दीत बनगाव रस्ते परिसरात कोंबडी व मटन व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करुन दुकाने थाटली होती.या दुकानांच्या उघड्या वेस्टेजमुळे नागरिकांना रहदारीला आळा बसला होता. तर दुकानात कापलेल्या मटन-चिकनचे वेस्टेज लोकवस्तीत पसरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.यावेळी तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस निरीक्षक एस. दासुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव मानकर, उपसभापती रविदत्त अग्रवाल, सरपंच सुषमा भुजाडे उपस्थित होते.