केंद्रीयमंत्र्यांच्या वाड्यासमोर ९ ऑगस्टला ‘विरा’तर्फे ढोल-ताशा आंदोलन

0
9

साकोली,,दि. 16 –भाजपाला सत्तेवर येऊन तीन वष्रे झाली. तरी वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचे आश्‍वासन पूर्ण झाले नाही. म्हणजेच विदर्भ राज्याच्या मागणीच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.विदर्भ राज्याची मागणीसाठी विदर्भ राज्याची मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या ४ वर्षापासून,आंदोलने व इतर मार्गाने स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत आहे. पण, शासन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे आता हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी विदर्भ चंडीकेची पूजा करून विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागणींचे आदोलन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यासमोर ढोल-ताशा वाजवून त्यांना स्वतंत्र विदर्भ राज्य द्या अथवा खुर्ची खाली करा असे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी साकोली येथील संत लहरीबाबा मठ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ हा भूप्रदेश स्वयंपूर्ण असून स्वतंत्र राज्याच्या दर्जा मिळणे गरजेचे आहे. राज्य निर्मितीसाठी येथे पूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. सध्या येथे असलेल्या वीज निर्मिती केंद्रातून ६३00 मेगावॅट वीज निर्मिती होते. विदर्भाला फक्त ३२00 मेगावॅट विजेची गरज आहे. तरीही येथे १३२ वीज प्रकल्प उभारणी करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी १ लक्ष एकर जमीन टावर्ससाठी ९0 हजार एकर जमीन विदर्भाची लागणार आहे. होणार्‍या राख व धूर आदींच्या प्रदुषणाने व त्यासाठी लागणारी वनसंपदा खनीज संपदा सिंचनाचे पाणी मोठया प्रमाणावर लागणार असल्याने विदर्भाचे काय होईल? त्यामुळे गरज नसताना वीज निर्मिती प्रकल्प येथे सुरू करू नये. विदर्भातील लोकांना अध्र्या दरात वीज मिळावी, शेतकर्‍यांना कर्ज माफ करताना जाचक अटी लादू नये. विकासाच्या नावावर विदर्भाच्या नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास करू नये. विदर्भराज्य झाल्यावर विदर्भ स्वत:चा विकास आपले अस्तित्व कायम ठेवून करण्यास योग्य आहे. असेही राम नेवले यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून माहिती दिली. पत्रपरिषदेला विष्णू आष्टीकर, अर्जून सूर्यवंशी, के. एन.नान्हे, तुषार हटवार, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, सुरेशसिंग बघेल आदी उपस्थित होते.