10 हजाराचे तातडिचे कर्ज शेतक-यांना मिळालेच नाही- डाॅ.तुमसरेंचा आरोप

0
17

साकोली,दि.23-महाराष्ट्र सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषना केली.कर्जमाफीची घोषणा होताच ज्या शेतक-यांवर कर्ज होते,त्यांना तात्पुरते बि-बियाणे खरेदी करीता खरीप लागवडीसाठी 10 हजार रूपयाचे कर्ज ताबडतोब उपलब्ध करून देण्याचे परीपत्रक काढण्यात आले.मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील एकाही तालुक्यात शेतकर्यांना तातडिचे 10 हजार रूपयाच्या कर्जाचे वाटपच करण्यात आले नसल्याचा आरोप डाॅ. अजयराव तुमसरे यांनी केलेला आहे.भंडारा जिल्ह्यातील दहा हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आलेल्या शेतक-यांची संख्या 3% (टक्केच) आहे.दहा हजार रुपयाचे तातडीचे कर्ज देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅक तयार आहे.परंतु शासनाचे कठोर निकषामुळे शेतक-यांना तातडीचे 10 हजार रूपये मिळू शकत नाही. राज्य सरकारने कठोर निकष लावल्यामुळे शेतक-यांनीही मागणी करीत नसल्याने खदखद व्यक्त करीत असल्याचे चित्र संपुर्ण जिल्ह्यात दिसत आहे.दरवर्षी प्रमाणे पिक विमा योजनेकरीता शासनाने 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.परंतू मागील वर्षी ज्या शेतक-यांनी पिक विमा काढला,त्यापैकी अनेक शेतक-यांचे नुकसान झालेले असतांना सुध्दा अजून पर्यंत मोबदला मिळालेला नसून शेतक-यांची एकप्रकारे फसवणूक करीत संबधीत विमा कंपनीला शासन पाठिशी घालत असल्याचा आरोपही डाॅ. अजयराव तुमसरे यांनी केलेला आहे.मागच्या जुन मध्ये जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खोलमारा आणी मासळ या गावातील तसेच मोहाडी तालुक्यातील शेतक-यांनी आत्महत्या कलेल्या असून राज्य सरकार आणखी किती शेतक-यांचा बळी घेणार आहे असा संतप्त सवालही डाॅ. अजयराव तुमसरे यांनी केलेला आहे.