पालकमंत्र्याच्या दत्तक गावातच भाजपाचा पराभव

0
11

सडक-अर्जुनी,दि.23:तालुक्यातील कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या पार पडलेल्या निवडणूकीत शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत पराभव केला.रविवारी (दि.१६) झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतले आहे. त्याच गावात भाजपाचा पराभव झाल्याने वेगळ्याच चर्चेला उधान आले आहे.निवडून आलेल्या शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलच्या सदस्यामंध्ये जामेश्वर धनभाते, ईश्वर कोरे, आकोजी रहिले, ज्ञानदेव गहाणे, सुर्यादेव घरत, नामेश्वर कुरसुंगे, अशोक कुरसुंगे, गोपाळा घोरमोडे, चिंधू बोपचे, फुलचंद चवरे, गेंदलाल मेश्राम, रंजना भोयर, कल्पना मडावी या १३ सदस्यांचा समावेश आहे. कनेरी हे पालकमंत्री बडोले यांचे दत्तक गाव असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांवर जनता नाराज असल्याने हा पराभव झाल्याची चर्चा आहे.कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. भाजपासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली होती.