भरधाव लक्झरीची अ‍ॅपेला धडक, १ ठार ८ जखमी

0
11

बुलडाणा,दि.24:  सैलानी बाबाच्या दर्गावर जाणाºया भाविकांच्या अ‍ॅपेला भरधाव वेगात असलेल्या लक्झरी बसने मागून धडक दिल्यामुळे अ‍ॅपेतील १ ठार तर इतर ८ भाविक जखमी झाले.या अपघातील जखमींवर येथील बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना २४ जुलै रोजी दुपारी राजूर घाटातील मोहेगाव फाट्याजवळ घडली.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील ग्राम मोरवाड येथील तडवी भिल समाजाचे काही नागरिक २४ जुलै रोजी आपल्या गावातील दोन अ‍ॅपेने बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गावर दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान मलकापूर-बुलडाणा मार्गावरील राजूर घाटातील मोहेगाव फाट्याजवळ एमएच-१९-८१५६ या क्रमांकाचा अ‍ॅपे मागून येणाºया दुसºया भाविकांच्या अ‍ॅपेसाठी थांबला होता. यावेळी भाविक अ‍ॅपेमध्ये बसलेले होते. दरम्यान सूरत येथून मेहकरकडे जाणाºया भरधाव वेगात असलेल्या जीजे-१४-६६८८ क्रमांकाच्या लक्झरी बसने अ‍ॅपेला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अ‍ॅपे रस्त्याच्या बाजूला उलटला. यावेळी लक्झरी बसचा चालक न थांबता लक्झरीसह बुलडाण्याकडे पळाला. तर लक्झरीच्या धडकेमुळे रस्त्याच्या बाजूला उलटल्यामुळे अ‍ॅपेतील सुभान जंगू तडवी वय ४५ गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर शकील सुभान तडवी वय २५, सिमरन शकील तडवी वय ३,संतोष देवराव शितोरे वय ३५, सरफराज नत्थू तडवी वय ४०, नफीसा उमर तडवी वय १८, अजमत सरफराज तडवी वय ११, इमरान फत्तू तडवी वय ११ तसेच सानिया शकील तडवी वय १० जखमी झाले. घटनेनंतर लक्झरी बस चालक घटनास्थळावरून फरार
झाल्याची माहिती बुलडाणा पोलिसांना मिळताच पोलिसांनी बुलडाण्यात लक्झरी अडवून पोलिस स्टेशनमध्ये जमा केली.