अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरु पदमुक्त

0
9

अकोला,दि.29 : भारतीय नागरिक नसल्याच्या कारणावरून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी यांना पदमुक्त करण्याचा निर्णय राज्यपाल तथा कुलपती विद्यसागार राव यांनी घेतला आहे. या निर्णयाने विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली आहे. 
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ अनेक तक्रारींमुळे चर्चेत आला होता. कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी डॉ. दाणी यांच्याविरुद्ध सुमारे 132 तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या नागरिकत्वाच्या तक्रारी झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा विधी व न्याय विभाग, राज्याचे महाधिवक्ता तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचेकडून अभिप्राय मागविल्यानंतर त्यांना कुलगुरुपदावरून पदमुक्त करण्याचा निर्णय घेत राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी डॉ. दाणी यांच्या सेवा ते भारतीय नागरिक नसल्याच्या कारणाने तात्काळ प्रभावाने समाप्त केल्याचे बोलले जात आहे.