रुद्रापूरात विज पडून दौन बैल ठार

0
14

मूल,दि.30-सावलीपासून 3 किमी अंतरावरील रुद्रापूर येथे शनिवारच्या सायकांळी अचानक आलेल्या जोरदारपावसासोबतच विज पडल्याने दोन बैलांचा मृत्यु झाल्याची घटना घडली.जीवन परचाके हे आपल्या शेतामध्ये काम करत असतांना साडेपाचवाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस आला त्यामध्ये त्यांच्या दोन बैलाचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.त्या बैलजोडीची किमंत अंदाजे 70 हजाराच्या जवळ होती.त्यातच एैन रोवणीच्या कामाच्यावेळी ही घटना घडल्याने शेतकरी आऱ्थिक संकटात सापडला आहे.घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांनी लगेच तहसीलदार,बीडीओ व पशु वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली.शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष पाल तसेच भाजपा महामंत्री सतीश बोम्मावार ,पंचायत समिती सभापती, छायाताई शेंडे, ज.प.सदस्य मनीषा चिमुरकर ,युवा ता.अध्यक्ष विनोद धोटे यांनी केली आहे.