जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी दिले धरणे

0
13

गोंदिया,दि.03 : केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी गोंदिया जिल्हा कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून मागण्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, देशातील विकासात्मक कामात नेहमी अग्रेसर असणाºया शासकीय कंत्राटदारास जुन्या कामांना जीएसटी कर प्रणाली लावल्यामुळे १८ टक्यांचे नुकसान कंत्राटदारांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे ही जीएसटी कर प्रणाली जुन्या कामांपासून लवकरात लवकर काढण्यात यावी, अन्यथा कंत्राटदार संघटना संपूर्ण राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारेल, असाही इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष उदय प्रमर म्हणाले की, शासन विविध प्रकारच्या अटी लावून कंत्राटदाराचे हात बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. यात पाच वर्षे जुन्या मशिनरीज वापरता येणार नाही, मात्र आरटीओ १५ वर्षांची परवानगी देत आहे. पाच वर्षात जर नवीन मशिनरीज घ्यावी लागत असेल तर कंत्राटदाराला काम करणे अवघड जाणार आहे. हा निर्णय कंत्राटदारांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. यामुळे अनेक कंत्राटदार रस्त्यावर येतील. जुन्या कामांवर दोन टक्के व्हॅट भरण्याची प्रणाली होती. त्याप्रमाणे नियोजन करून कामे केली जात होती. मात्र जुन्या कामांवर दोन टक्के व्हॅटऐवजी १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे कंत्राटदारांना १६ टक्क्यांचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हा भुर्दंड कोणत्याही परिस्थिती कंत्राटदार सहन करणार नाहीत. त्याकरिता कामबंद करून उपोषण करण्याचा इशाराही संघटनेचे माजी अध्यक्ष गुलाब बोपचे,राजु वालिया,अरुण दुबे,अनिल रहागंडाले,राधारमण अग्रवाल, आदिंनी आपल्या मार्गदर्शनात दिला.आंदोलनात आनंद ठाकुर,खुमेंद्र मेंढे,आनंद जैन,महेंद्र बघेले,सी.के.बिसेन,रिंकु प्रमर,संतोष भेलावे,जगदीश लालवानी,शाम चंदनकर,मनिष चौरागडे,नुतन सोनावने,सैलेश जायस्वाल,दिनेश कोडवानी,सुनिल येवले,अजय टाह,नितिन मेश्राम,रवी भरणे,विष्णु शर्मा,अभिषेक जैन,उमेश कापसे,संतोष पुरोहित,मोहन दलवानी,किरण बिसेन,तांजेद्र हावडा,हितेश बिसेन,सुधीर मानकर,विमल असाटी,मुकेश अग्रवाल,आदित्य प्रमर,महेंद्र गाडे,राहुल फेंडारकर,संजय मुरकूटे,छगन पंजारे,पारस कटकवार,सुरेश पटले,टुलेंद्र कटरे,अनुप बोपचे,कैलास गौतम,राजीव शेळके,भरत पाटील,बाळा ठवकर,अनुप कटरे,असलम गोडील आदी कंत्राटदार यात सहभागी झाले होते.