राणी दुर्गावती चौकात रास्ता रोको आंदोलन

0
4

देवरी,दि.04 : देशव्यापी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या आवाहनानंतर बुधवारी राणी दुर्गावती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे वरिष्ठ नेते शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात भर पावसात शेतकºयांनी आंदोलन यशस्वी केले. महाराष्टÑ राज्य किसान सभा तालुका कौन्सिलच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनापूर्वी राणी दुर्गावती चौकात बाबुराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली. सभेला शेतकरी-शेतमजुरांचे वरिष्ठ पुढारी शेखर कनोजिया, महादेवराव लांडेकर, गणेश बिंझलेकर, मोहम्मद नईम शेख यांनी संबोधित केले. अध्यक्षीय भाषणातून झालेल्या आवाहनानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यानंतर संघटनेच्या १३ सदस्यीय प्रतिनिधी मंडळाच्यावतीने प्रभारी उपविभागीय अधिकारी (महसूल) विजय बोरूंडे यांना व त्यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन पाठविण्यात आले.
सदर रास्ता रोको आंदोलनात शंकर बिंझलेकर, बाबुराव राऊत, रेखा ताराम, नाशिका सरजारे, मोतीराम कोराम, फागुराम मानकर, सुक्षकला नंदागवळी, शारदा उईके, अशोक साखरे व कार्यकर्ते उपस्थित होते.