गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा-ऱाँकाचे निवेदन

0
25

गोंदिया,दि.08: हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर वरील रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे आता पाऊस झालाही तरी शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून दुष्काळी परिस्थिती बघता शेतकºयांना मदत करण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदन देताना शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिलाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रीकापुरे, अशोक सहारे, शिव शर्मा, टिकाराम मेंढे, राजू एन. जैन, डुमेश चौरागडे, केतन तुरकर, जितेश टेंभरे, तिर्थराज हरिणखेडे, रमेश गौतम, कैलास पटले, सुखराम फुंडे, नानू मुदलीयार, जगदीश बहेकार, रफीक खान, गणेश बरडे, देवेंद्रसिंह मच्छिरके,लता रहांगडाले, जिम्मी गुप्ता, प्रमोद शिवणकर,गुड्डू बिसेन, मदन चिखलोंढे, राजेश तुरकर, रामु चुटे, विनायक शर्मा, रौनक ठाकुर, नितेश बहेकार, मनिष अग्रहरी, एकनाथ वहिले, संजीव राय, रमन उके, चंद्रकुमार चुटे, नरेंद्र ठाकुर, ज्ञानेश्वर पगरवार, करन टेकाम, सुरेश कावळे, महेंद्र बघेले, खेमराज शरणागत, सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात, ३१ जुलैच्या स्तरावर जिल्ह्यात सरासरी ६७४.८७ मिमी. पावसाची आवश्यकता असते. परंतु फक्त ४४२.०१ मिमी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ४० टक्के असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व शेत मजुर अडचणीत असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, संपूर्ण जिल्ह्यात धानाची नर्सरी न लावलेल्या शेतीचे कृषी व महसूल विभागाच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे, धानाची नर्सरी ज्या शेतकºयांनी पाण्याच्या अभावी लावली नाही त्या शेतकºयांना तातडीने मदत करणे, जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्या संबंधी उपाययोजना करणे, ज्या शेतकºयांनी या हंगामामध्ये शेतीसाठी बियाणे व खतांवर लाखो रुपये खर्च केले त्याची भरपाई शासनाकडून करणे, अशा शेतकºयांची यादी तयार करुन ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांना तातडीने विशेष बाब म्हणून शासनाच्यावतीने पीक विमा योजना काढणे, नर्सरी लावली परंतु पाऊस नसल्याने ती मरत आहे त्या शेतकºयांचे सर्वेक्षण करुन मदत करने व विशेष बाब म्हणून पीक विमा करणे, मागेल त्याला काम या दृष्टीने महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे नियोजन करुन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर त्यांचेच गावात कामे उपलब्ध करुन देणे, पुढील हंगामासाठी शेतकºयांना मोफत बियाणे व खते उपलब्ध करुन देणे, ज्या शेतकºयांकडे बॅकांची अल्प मुदती व मध्य मुदती चालू व थकीत कर्ज आहे ते माफ करणे, शेतकºयांकडील जनावरांसाठी छावण्या सुरु करुन मोफत चारा उपलब्ध करुन देणे, हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून हवामान खात्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे, पडीत जमिनीमध्ये ज्वारी सारखी कमी पावसाची पिके घेत येत असतील तर त्या दृष्टीने शेतकºयांना मदत करण्यात यावी अशी मागणी केली. अशात दुष्काळी परिस्थिती बघता शासनस्तरावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले.