शेतकºयांचा वीज कर्मचाºयांना घेराव

0
14

भंडारा,दि.12 : महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. निसर्गाने दगा दिल्याने शेतातील धानपिके करपली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी वीज कर्मचाºयांना शुक्रवारला घेराव घातला. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
महावितरणच्यावतीने कृषीपंप धारक शेतकºयांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र हे आश्वासन हवेत विरले असून महावितरणने शेतकºयांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी केला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकºयांच्या शेतातील धानपीक करपले आहेत. पाण्याअभावी अनेकांची रोवणी खोळंबली आहे. त्यामुळे आज शुक्रवारला शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयावर यांची कैफियत मांडण्याकरिता गेले. यावेळी अधीक्षक अभियंता यांची भेट होऊ न शकल्याने संतप्त शेतकºयांनी महावितरणच्या कर्मचाºयाला घेराव घातला. मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्या नेतृत्वात मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, शहर अध्यक्ष विभा साखरकर, नितीन वानखेडे, मिलिंद ठाकरे, दिनेश बारापात्रे, आयुश चौधरी, होमेंद्र शहारे, गणेश वानखेडे आदींनी निवेदन दिले. यावेळी शेतकरी दिनेश गायधने, रामराव देशकर, विजय डके, संदीप भेदे, गजानन भेदे, मनोज भेदे, श्रीराम मस्के, सुरेश भेदे, संभाजी देशकर, दत्तू मदनकर, दादू घोसडे, चंदू मदनकर, दिगांबर मदनकर, राजू भेदे, ओमप्रकाश वाडीभस्मे, श्रीराम दुधबर्वे, विनोद भेदे आदी उपस्थित होते.