लायनेस क्लबच्यावतीने पोलिस ठाण्यात रक्षाबंधन

0
6

देवरी,दि.13 : आज आपण आपल्या मनात कोणतीही भिती, शंका न बाळगता कुठेही ये-जा करू शकतो. ते केवळ पोलीस व देशातील जवानांमुळेच, परंतु हे जवान आपल्या कुटूंबाना सोडून देश व समाजाच्या सेवत सदैव तत्पर असतात. देश व समाजाच्या रक्षणार्थ सेवेत असणाºया जवानांना आपुलकीची साथ आवश्यक असल्याचे प्रतिपादन देवरी लायनेस क्लबच्या अध्यक्ष पिंकी कटकवार यांनी केले.लॉयनेस क्लबच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त देवरी पोलीस स्टेशन व बाघ नदी येथील आयटीबीपी ३८ वी वाहिनीच्या अधिकारी व जवानांना सामुहिकरित्या रक्षाबंधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर आणि ३० पोलिस जवान आणि बाघनदी येथील आयटीबीपी ३८ वी वाहिनी कॅम्प प्रमुख जी.डी.आशिषकुमार, उपनिरीक्षक जी.डी.जुगल किशोर व ६० जवानांना लॉयनेस क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी सामूहिकरित्या राखी बांधून व गोड तोंड केले.दरम्यान जागतिक आदिवासी दिनानिमित्त आॅफताब मंगल कार्यालयात आयोजित जनजागृती मेळाव्यात आदिवासी समाजातील १० वी १२ वी च्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त १० विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते डिक्शनरी देऊन सत्कार करण्यात आला.
लायनेस क्लबच्या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात व विद्यार्थ्यांना डिक्शनरीचे वाटप लायनेस क्लबच्या अध्यक्ष पिंकी कटकवार, सचिव सरोज शेंद्रे, कोषाध्यक्ष सुलभा भुते, सदस्य संगीता पाटील, शुभांगी निनाने, वनिता दहिकर, लक्ष्मी पंचमवार, पुष्पा नळपते, प्रिती भांडारकर, नाशिका पटेल, चित्रा कडू, पिंकी तिवारी, आरती चौरागडे, वैशाली संगीडवार, गौरी देशमुख, शितल सोनवाने, अलका दुबे, अर्चना नारनवरे, शुभांगी घोडसेलवार, कमलेश्वरी गौतम, करुणा कुर्वे, माया खोब्रागडे, ललीता राऊत, पूजा चुंचूंवार यांच्या हस्ते करण्यात आले.