गोरखपुर प्रकरणाची पुनरावृत्ती गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात होण्याची शक्यता-किशोर समरिते

0
18

ऑक्सिजन पुरवठा करणाèया कंपनीला अवैध मंजुरी
ताqत्रक अटी व शर्तीनां डावलून गोंदियाच्या श्याम ट्रेडर्सला मंजुरी

गोंदिया,दि.13(बेरार टाईम्स)-उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात ऑक्सिजनमुळे ६२ मुलांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणाने सर्वत्र हाहाकार माजलेला असतानाच मध्यप्रदेशातील लांजीचे माजी आमदार बसप नेते किशोर समरिते यांनी अशा घटनेची गोंदिया व बालाघाट जिल्ह्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत आज दिली.समरिते यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील काही रुग्णालयांसह खासगी व्यवसायिकांना लिक्विड ऑक्सिनज सिलेंडरचा पुरवठा करण्याचे काम गोंदियातील श्याम इंटरप्रायजेस या कंपनीकडे आहे.वास्तविक या कंपनीत ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्यासोबतच रिफिलींगसाठी आवश्यक असलेला तांत्रिक कर्मचारी वर्ग कायद्यानुसार असायला हवे.परंतु माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीमध्ये प्रशिक्षित व रासायनिक पदार्थांचा ज्ञान असलेला व्यक्ती त्याठिकाणी कार्यरत नसल्याचे उघडकीस आले.जेव्हा की ज्या व्यक्तीचे नाव देण्यात आले ते नरेश शाहू नामक व्यक्ती हे गोंदियाच्या श्याम इंटरप्रायजेसमध्ये नोकरी न करता छतीसगड राज्यातील भिलाई येथील अतुल ऑक्सिजन प्रायवेट लि.कंपनीत नोकरीवर आहे.त्या व्यक्तीच्या कागदपत्राच्या आधारावर गोंदियात ऑक्सिजन रिफिqलगचे काम केले जात असून हा प्रकार अवैध असल्याचे समरिते यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजन सिलेंडरमध्ये रिफिqलग करतांना कुठले केमिकल टाकले जातात याबद्दल शकां असून आजपर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू गोंदिया,भंडारा,बालाघाट जिल्ह्यात झाल्याची शंका व्यक्त केली आहे.प्रशिक्षित व्यक्तीच कारखान्यात नसेल तर रिफिqलग केलेला सिqलडर हा योग्य गुणवत्तेचा आहे हे कसे मानायचे असा प्रश्न उपस्थित करित अन्न औषध विभागाच्या अधिकाèयांचीही चौकशी होणे गरजेचे आहे.याप्रकरणात आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासोबतच,केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली.समरिते यांनी दिलेल्या माहितीनुसार श्याम इंटरप्रायजेस कवलेवाडा रोड,फूलचूर(गोंदिया)वतीने गोंदियातील आयुष क्रिटीकल मल्टीस्पेशालिटी हास्पीटल,गोंदिया केयर हास्पीटल,श्री राधाकृष्ण केयर हॉस्पीटल मास्टर कॉलोनी गोंदिया,गुरुकृपा मेडीकल सर्विस गोंदिया.बालाघाट येथील प्रभात गॅस कालीपुतली चौक बालाघाट,लालाजी ऑक्सीजन राममंदीर बालाघाट व इतर ठिकाणी लिक्विड ऑक्सिजनचा सिलिंडर पुरवठा जानेवारी २०१७ पासूनच सुरु आहे.मात्र या कंपनीला अन्न औषध पुरवठा विभागाच्यावतीने २९ मे २०१७ ला अधिकृत परवाना देण्यात आला आहे.ज्या नरेश शाहूला तांत्रिक कर्मचारी कागदोपत्री दाखवून परवाना घेतला,त्यानंतर या संयत्राचे काम श्याम इंटरप्रायजेसचे संचालक अग्रवाल यांच्याच कुटुबांतील एका अप्रशिक्षित व्यक्तीला राईस इंडस्ट्रीचा १० वर्षाचा अनुभव दाखवित ठेवण्यात आले.जेव्हा की सदर राईस मिल गेल्या पाच वर्षापासून बंद असल्याचेही माहिती समरितेनी दिली.ते म्हणाले की,गोरखपुर येथील घडलेल्या घटनेमुळे देशात हाहाकार माजलेला असतानाच गोंदियात तांत्रिक तसेच अटी व शर्तींना धाब्यावर बसवून सयंत्र सुरु करण्याचा दिलेला परवाना हा नागरिकांच्या जिवावर केव्हाही बेतू शकतो.तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करुन पुढे होणारा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टाने आपण महाराष्ट्राचे अन्न औषध व प्रशासन विभागाच्या आयुक्तांना तक्रार दिल्याचे सांगितले.याशिवाय गोंदियाचे पालकमंत्री,राज्याचे आरोग्य सचिव,विक्रिकर आयुक्त,आयकर विभाग,कामगार आयुक्तांनाही तक्रार दिली आहे.याप्रकरणात महाराष्ट्र सरकारने लगेच दखल घेत कारवाई न केल्यास आपण केंद्रसरकारकडे सुद्दा हे प्रकरण लावून धरणार असल्याचे सांगितले.