नवजात शिशुंना मायेची ऊब : श्रीमती सई काळे

0
15

गोंदिया,दि.१८ : राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम व युनिसेफ यांच्यामार्फत बाई गंगाबाई महिला रुग्णालय येथे नुकताच १ ते १५ ऑगस्ट जागतिक स्तनपान जनजागरण पंधरवाडा साजरा करण्यात आला. या जनजागृती अभियानाचा समारोप जिल्हाधिकारी यांच्या पत्नी श्रीमती सई काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.सुवर्णा हुबेकर, डॉ.चांदणी बग्गा, डॉ.गार्गी बहेकार, डॉ.मनिंदरसिंग जुनेजा, डॉ.योगेश सोनारे उपस्थित होते.
श्रीमती काळे यावेळी म्हणाल्या, कुपोषण हा एक मोठा राष्ट्रीय कलंक आहे. तो मिटविण्यासाठी बाळाला जन्मापासूनच स्तनपान दयावे, बाळाला चांगला पुरक आहार दयावा. ‘शुन्य मातामृत्यू व शुन्य बालमृत्यूङ्क अभियानाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाची सशक्त यंत्रणा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या मदतीला दिली आहे. त्यामुळे मातांनी नवजात शिशुंची योग्य ती काळजी घ्यावी. कारण सुदृढ बालके हीच देशाची खरी संपत्ती आहे. बालरोगतज्ञांनी अपुऱ्या दिवसाच्या व कमी वजनाच्या नवजात शिशुंची चांगली काळजी घ्यावी, कारण प्रत्येक जीव हा महत्वाचा घटक आहे असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी श्रीमती सई अभिमन्यू काळे यांनी ५० गरम वुलन उबदार शालींचे वितरण नवजात शिशु व स्तनदा मातांना वाटप केले. बाई गंगाबाई महिला रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, मेट्रन श्रीमती मेश्राम, भगत सिस्टर, शिवणकर, माधुरी लाड यांनी श्रीमती काळे यांचे आभार व्यक्त केले.