कोषागार अधिकारी नेमाडे यांना निरोप

0
16

गोंदिया,दि.१८ : जिल्हा कोषागार कार्यालयातील कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे यांची बदली हातमाग यंत्रमाग वस्त्रोद्योग संचालनालय नागपूर येथे लेखा अधिकारी या पदावर झाल्याने त्यांना ५ ऑगस्ट रोजी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याकरीता कार्यमुक्त करण्यात आले. यानिमित्ताने श्री.नेमाडे यांना निरोप देण्याकरीता कोषागार कार्यालयाच्या वतीने १६ ऑगस्ट रोजी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी कोषागार अधिकारी प्र.द.पारधी तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जी.डोंगरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीमती प्रियंका चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास कोषागार कार्यालयातील अज्ञान हुमने, एल.एच.बावीस्कर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.