सालई खुर्द येथे शिवसेनेचा ‘रास्तारोको’

0
18

तुमसर,दि.25: बावनथडी सिंचन प्रकल्पाचे कालवे अस्तव्यस्त असून, बावनथडीच्या अधिकार्‍यांनी सतत ३ वर्षापासून दिरंघाई केली याचा उद्रेक म्हणून शेवटी शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांचा आसरा घेऊन गुरूवारी (ता. २४) रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अनेक शेतकर्‍यांचे रोवणे अर्धवटच आहेत. सिंचन प्रकल्पात पाणी असताना सुद्धा अधिकार्‍यांनी पाणी दिले नाही. मागच्या आठवड्यात दोन शेतकर्‍यांनी शेतीला पाणी न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या. अनेक गोरगरीब, निराधार व्यक्तींना ६ – ६ महिने मानधन सुद्धा मिळत नाही. परंतु अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात.
आंदोलनात शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शेतकर्‍यांनी निषेध करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख पवन चव्हाण, उपतालुका प्रमुख विनोद राहांगडाले, महेश पटले, अमित मेश्राम, मनोज चौबे, अंकुश पटले, मनोहर जांगळे, उमेश पटले, आसाराम दमाहे, कुंजीलाल पटले, नितीन लिल्हारे, नरेश टेंभरे, शंकर पटले, राजेश भगत, गोवर्धन पटले, सुखदास लिल्हारे, माजी सरपंच अमरकंठ सव्वालाखे, गुलाब पटले, बाळू पारधी, जयदेव चौधरी, भाऊराव गडरीया, गभने, भागचंद शरणागत, वसंता जिभकाटे, कृष्ण पटले, चेदुराम निमकर, जयराम नागपुरे, लीलालिल्हारे, तारा भोयर, शिवराम गजभिये, राहुल लिल्हारे, योगेश परतेती, पृथ्वीराज खांडेकर, शिवलाल लिल्हारे, विनायक शरणागते, फदिश बले अनेक शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.