तिरोडा तालुक्यातील माल्ही येथे वीज पडून शेतक-याचा मृत्यू

0
8

गोंदिया,दि.25-आज दुपारनंतर आलेल्या पावसासह विज कोसळून तिरोडा तालुक्यातील माल्ही येथे वीज पडून शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर शेतकरी हा शेतावर पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेला होता.सेवकराम बिसेन असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.धान पिकांची पाहणी करण्याकरीतासेवकराम हे काल संध्याकाळी ५ वाजता दरम्यान शेतीवर गेले होते. त्यावेळी अचानक विजेचा कडकडाट सुरु झाला आणि त्यातच अंगावर वीज पडल्याने या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बाजूलाच शेतीवर काम करत असलेल्या इसमाने याची माहिती गावकऱ्यांना दिली असता गावकऱ्यांनी घटना स्थळावर जाऊन पाहणी केली असता सेवकराम यांचा मृत्यू झाला होता.