वाईन शॉप दुकानाच्या विरोधात महिलांचा एल्गार

0
15

देवरी,दि.28- शासनाच्या नवीन धोरणानुसार शहर व गावागावात वेगवेगळया ठिकाणी दारूचे दुकान वाईन बार व वाईन शॉप उघडण्याचे परवाना देणे सुरू केले आहे. या अनुसंघाने देवरी येथील नगर पंचायत प्रभाग क्र.१२ मधील वंदना कन्या विद्यालयाजवळ नव्याने कुमार वाईन शॉपच्या दुकानाला परवाना देवून काल शनिवार (दि.१३) रोजी दुकान मालक सुधीर मेघराजानी हे दुकान उघडण्यास गेले असता या प्रभागातील ३० ते ४० महिलांनी विरोध दर्शवित सदर दुकान अजिबात या ठिकाणी उघडू नये याबाबद एल्गार पुकारला. यात सविस्तर असे की, शासनाच्या नवीन धोरणानुसार शहर वगावागावात वेगवेगळया ठिकाणी दारूचे दुकान, वाईन शॉप उघडण्याचे परवाना देणे सुरू केले आहे. या अनुसंघाने देवरी नगर पंचायत मधील प्रभाग क्र. १२ मध्ये वंदना कन्या विद्यालयजवळ कुमार वाईन शॉप या दुकानाला परवाना दिला.

या दुकानाचे मालक सुधीर मेघराजानी काल शनीवार(ता.१३) रोजी आपले दुकान उघडण्यास सदर ठिकाणी गेले असता या प्रभागातील ३० ते ४० महिलांनी दुकान उघडण्यास मनाई करित या विरोधात एल्गार पुकारून आंदोलन केले. या आंदोलनात प्रभाग क्र.१२ चे नगरसेवक संजय उईके, प्रभाग क्र.१३ ची नगरसेविका भूमिकाताई बागडे, नगरसेविका मायाताई निर्वाण यांच्यासह प्रभागातील ३० ते ४० महिलांनी पुढाकार घेत सदर वाईन शॉप उघडण्यास मनाई करित शासनाला मागणी केली आहे की सदर वाईन शॉप qकवा इतर दारूचे दुकान जर देवरी शहरात उघडण्याची परवानगीसर्व देवरी शहरातील महिला या विरोधात उग्र आंदोलन करू अशी चेतावणीही दिली आहे.