गरिबी निर्मुलनाचा केंद्र सरकारचा संकल्प: हंसराज अहीर

0
25

गडचिरोली, दि.१: गरिबी, भ्रष्टाचार व जातियवादाचे उच्चाटन करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून, त्याअनुषंगाने योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. गरिबी संपविण्यासाठी ग्रामीण भागातील माणसाला सशक्त करण्यावर सरकारचा भर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरुवारी केले.

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रभात मंगल कार्यालयात आयोजित ‘संकल्प ते सिद्धी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी एएसआर नायक, नगराध्यक्ष योगीता पिपरे, ब्रम्हपुरीचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, कृषी विद्यापीठाचे डॉ.मानकर, डॉ. तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.