24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ आल्लीपल्लीत स्वच्छता फेरीचे आयोजन

आल्लीपल्लीत स्वच्छता फेरीचे आयोजन

0
41

आलापल्ली,दि.४(सुचित जम्बोजवार): स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावा या उद्देशाने ग्रामपंचायत आलापल्लीच्यावतीने हागंणदारीमुक्त गाव योजनेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी गावामध्ये स्वच्छता फेरी काढण्यात आली. या फेरीच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करीत हागणदारीमुक्त व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती राकेश तलांडे, सरपंच रेणुका कुलमेथे,उपसरंपच पुष्पा अलोने,ग्रा.प.सदस्य आशिष झाडे,संतोष तोडसाम,सुधाकर पेद्दीवार,सलीम शेख,विनोद अकनपल्लीवार,सुंगधा,मडावी,चंद्रकला तलांडे,अर्चना कोडापे,संगिता इस्काप,रविंद्र मुप्पीडवार,ग्रामविकास अधिकारी रमण गंजीवार,तालुका समन्वयक  महेश बावने,संजय कोठारी सर्च मुक्तीपथचे विजय सिडाम,विद्या पाल उपस्थित होते.