ऑनलाईन अर्जाकरिता गावपातळीवर शिबिर आयोजित – आ.रहांगडाले

0
30

तिरोडा,,दि.4- ज्या गावात महाऑनलाईन केंद्र सुरू नाही किंवा इंटरनेट बरोबर काम करीत नसेल व सर्वरची अडचण येत असेल अशा गावी शेतकèयांना कॅम्प घेवून मार्गदर्शन करावे व शेतकèयांचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज भरून घ्यावे तसेच ज्या शेतकèयांचे १६ अंकी बचत खाते/कर्ज खाते नाही अशा शेतकèयांना १६ अंकी बचत खाते त्वरीत उघडण्यासाठी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी तात्काळ व्यवस्था करावी व गावपातळीवर सेवा सहकारी संस्थेच्या गटसचिव व अध्यक्षांनी यावर विशेष लक्ष पुरवून कर्जदार असलेल्या सभासदांना त्वरीत ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रोत्साहीत करावे, असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले. ते स्थानिक पंचायत समिती तिरोडा येथील सभागृहात विशेष आढावा बैठकीत बोलत होते.
आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. आढावा सभेला प्रामुख्याने तहसीलदार संजय रामटेके, तालुका निबंधक प्रमोद हुमणे, संजय गायधने, खंडविकास अधिकारी जावेद इमानदार, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, कृषी उत्पन्न बा.स. संचालक चर्तुभूत बिसेन, नायब तहसीलदार वाकचौरे, निरज सोनेवाने, तालुक्यातील महाऑनलाईन केंद्राचे संचालक व गटसचिव उपस्थित होते. यामध्ये नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत येणाèया तांत्रिक अडचणी तसेच तालुक्यातील महाऑनलाईन सेंटर, सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, सेतु सेवा केंद्र यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावर चर्चा करण्यात आली. तालुक्यामध्ये प्रामुख्याने एकूण १६७५६३ थकीत कर्जदार शेतकरी असून ५८७३ सभासद आहेत. आदिवासी संस्था ६४६ कार्यरत असून ६३० थकीत आहेत तर १६ चालू वर्षातील आहेत. तसेच तालुक्यात ९२ पैकी ५९ महाऑनलाईन केंद्र सुरू आहेत. ४१९६ ऑनलाइन अर्ज शेतकèयांनी कर्जमाफीसाठी भरलेले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख शासनाने १५ सप्टेंबर निश्चित केलेली आहे. त्यासाठी प्रत्येक कर्जदारांचे ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ मिळण्याकरिता तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी शेतकèयांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन आ. रहांगडाले यांनी केले.