आजपासून कुष्ठरुग्ण शोध अभियान

0
24

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णाचे प्रमाण २ आहे. जिल्ह्यात कुष्ठरुग्णाचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान ५ ते २० सप्टेबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी या अभियानाबाबतचा आढावा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ.पराडकर यांच्याकडून घेतला. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले. या मोहिमेदरम्यान शोधलेल्या संशयीत कुष्ठरुग्णांची तपासणी नियमीत बाह्य रुग्ण विभागात प्रामुख्याने करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोहिमेदरम्यान कोणत्याच प्रकारची कामात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी दिल्या असून अभियानादरम्यान तपासणीसाठी आलेल्या चमूला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.