तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

0
19

तिरोडा,दि.06-यावर्षी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी संस्थेच्या आमसभेत एकमुखाने तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव पारीत करण्यात आला.
सदर ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आले. तसेच सहकारी आयुक्त व जिल्हाधिकारी गोंदिया यांना सुध्दा प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची आमसभा पार पडली. अध्यक्षस्थानी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले होते. अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे सभापती डॉ. चिंतामन रहागडाले, माजी सभापती वाय.टी. कटरे, सेवा सहकारी सुकडीचे अध्यक्ष विलास मेश्राम, तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एच.डी. जांभूळकर, छबीलाल पटले, पारस पटले, कटरे, तेजराम चव्हाण, जयप्रकाश खोब्रागडे, खोब्रागडे, रमेश कटरे, यादोराव कटरे, बुधन पटले, मोहनलाल कटरे, जगदिश मुखेर, अरुण पटले, महादेव रहांगडाले, पप्पू कटरे, प्रकाश कटरे, शीला टेंभरे, लाला गजभिये, बंसोड, सर्व शेतकरी व गावकरी उपस्थित होते.
या वेळी सर्व शेतकºयांना कृषी बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले यांच्या हस्ते स्टील कटोरी वाटप करुन सत्कार करण्यात आला. आमसभेचे कार्यवृत्तांत सचिव जयप्रकाश खोब्रागडे यांनी सादर केले. प्रास्ताविक साहेबराव बंसोड यांनी मांडले. संचालन रविंद्र बंसोड यांनी केले. आभार लाला गजभिये यांनी मानले.