डांगोरली-सुकडी(म.प्र.)दरम्यान पुल बांधकामासाठी मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांची मंजुरी

0
6

गोंदिया,दि.06 – गोंदिया विधानसभा क्षेत्राचे ग्राम डांगोरली व मध्यप्रदेशच्या ग्राम सुकडीदरम्यान बाघ नदीवर पुलाच्या निर्माण कामांना मंजूरी मिळण्यासाठी आ.अग्रवाल यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली. चर्चेत त्यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना परिस्थितीसोबत अवगत करून सांगितले की, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रदरम्यान पुल व पुलाचे निर्माण करणे योग्य राहणार असा अहवाल प्राप्त झाला. बैरेजमुळे सध्या कार्यरत डांगोरली उपसा सिंचन योजना, रजेगांवकाटी उपसा सिंचन योजना, तेढवा उपसा सिंचन योजना तसेच गोंदिया शहरातील अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेकरिता पाणी अडविण्यात येईल.बैरेजच्या निर्माणामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील नदी लागून असलेल्या परिसरात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतील तसेच बंधाèयावर लघु विज उत्पादन बंधाèयाच्या कामामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांची पाणी पुरवठयाची समस्या सुटणार असून दोन्ही राज्यातील एक लाखापेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल ते पुढे म्हणाले मागील ५ ते ७ वर्षापासून याकरिता प्रयत्न सुरू असून महाराष्ट्र शासनाद्वारा बॅरेज निर्माणाकरिता सर्वे करून लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणानातङ्र्के सर्व बाबींवर तपास करून डांगोरली व सुकडी दरम्यान बाघ नदीवर बंधारा व केंद्र स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बैरेज निर्माणाला शेवटची मंजूरी अंतरराज्यीय नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मिळणार आहे.