राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे डेबूजी धांडे यांना निरोप

0
10

लाखनी,दि.08-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे तत्कालीन सहकार्यवाह डेबूजी धांडे यांनी वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर संस्थेच्या सर्व जबाबदारीतून स्वखुशीने मुक्त होण्याचा निर्णय घेतला. ते १९९५ पासून संस्थेचे सदस्य आहेत, १९९६ ते आज पर्यंत सहकार्यवाह म्हणून जबाबदारी ते सांभाळत होते. आज राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीच्या सभेत आपल्या कार्यकारणी पदाचा तब्येतीच्या कारणांनी राजीनामा दिला असून तो आज बहुमताने संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला. डेबूजी धांडे हे शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर यांच्या अतिशय जवळचे होते. बालपणापासून संघाचे स्वयंसेवक होते आणि संघाच्या तालमीत असल्यामुळे त्यांनी युवकांना पुढे करण्यासाठी स्वखुशीने पदत्याग केला. त्यांनी वाचनालय चळवळी मध्ये प्रत्यक्ष भाग घेतला असून विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या विस्तारात त्यांचा सिहांचा वाटा आहे. आज संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीत संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, शिवलाल रहांगडाले, मधुकर लाड, बाळासाहेब रणदिवे, डॉ अर्चना रणदिवे, गीता लाखनीकर आदी पदाधिकारी व प्रभाकर गजापुरे, नथु बांगडकर आणि विविध घटकसंस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन निरोप देण्यात आले.