महागुजरातचे जयराम धानाचे बियाणे निघाले बोगस

0
11

नवेगावबांध,दि.09- पावसाने दडी मारल्यामुळे आधीच शेतकरी संकटात साडलेला आहे. त्यात भरीस भर म्हणून शेतकर्यांनी पेरणीसाठी सुधारित जातीचे बियाणे म्हणून विकत घेतलेले महागुजरात कंपनीचे जयराम नावाचे बियाणे बोगस निघाल्यामुळे या परिसरातील अनेक शेतकर्यांवर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.शेतकर्यांनी पाणी विकत घेवून धानाची रोवणी केली, खत टाकले मात्र बियाणेच बोगस निघाल्याने शेतकर्यांना मुद्दल ही मिळणार की,नाही याांची शाश्वती नाही. या प्रकरणी शेतकर्यांनी ग्राहक मंचात जाण्याचा इशारा दिलाा असून महाराष्ट्र शासनाने बियाणे कंपनी व विक्रेत्यावर कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीप्रमाणे नवेगावबांध परिसरात सिंचनाची सोय असल्याने प्रामुख्याने भारी जातीचे धानाचे पीक घेतले जाते. परिसरातील १५-२० गांवातील शेतकरी नवेगावंबांध येथील विजय कृषी केंद्रातून बियाण्याची खरेदी करतात.

यावर्षी हवामान विभागाने सरासरी इतका पाऊस पडणार असे भाकित केल्याने शेतकèयांनी १२५ दिवसात येणाèया महागुजरात कंपनीच्या जयराम या धानाची निवड केली.सोलापूर येथील शेतकरी रेवनाथ लहानू हातझाडे यांनीत्यांच्या २.५ एकर शेतीसाठी ५० किलो बियाणे खरेदी केले शेतात विहिर असूनही विद्युत कने्नशन न मिळाल्याने भाड्याने पंप लावून रोवणी केली.कृषी तंत्राच्यानुसार वेळोवेळी रासायनिक खंताचा पुरवठा केला मात्र १२५ दिवसात फुटणारा धान फक्त ९० दिवसातच फुटायला सुरवात झाल्याने हातझाडेही हतबल झाले. यांची तक्रार त्यांनी विजय कृषी केन्द्र नवेगावं मार्फेत कंपनीला केली.

कंपनीचे अधिकारी आले मात्र १२५ दिवसात फुलोर्यावर येणारे धान ९० दिवसातच फुलोर्यावर कसे आले याचे उत्तर त्यांनाही देता आले नाही. जवळपास अशीच स्थिती या परिसरातील अनेक शेतकर्यावर आल्याने शेतकर्यांनी केलेले श्रम बोगस बियाण्यामुळे मातीमोल ठरले आहे.दरवर्षी जिल्ह्यातील शेतकèयांची सुधारित व प्रगत वाणाच्या नावावर फसवणूक केली जात आहे.मात्र जिल्हा प्रशासन व कृषि विभाग कुठलीच कार्यवाही करित नसल्याने निसर्गासोबतच आता शासनही कोपले असल्याची चर्चा करित आहे.या प्रकरणी जिल्हा प्रशासन व कृषि विभागाने दखल घेवून.संबंधित बोगस बियाणे पुरविणाèया कंपनी तसेच विक्रेत्यावर कार्यवाही करून शेतकèयांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या परिसरातील शेतकèयांनी केली आहे.