कोकलपार तलावात गोसेचे पाणी सोडण्यासाठी भाजयुमो उपाध्यक्ष झाडेंची धावपळ

0
17

सावली(चंद्रपूर)दि.12- चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी कोकलपार तलावात सोडण्यासाठी पुढाकार घेत राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करुन पाण्यामुळे यावेळी पिकांना नुकसान होण्याची शक्यता असल्याचे लक्षात आणून दिले.ना.मुनगंटीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीला विभागीय वनअधिकारी सोनकुसरे, कार्यकारी अभियंता गोसेखुर्द उजवा कालवा श्री हटवार,सहा.अभियंता यादव,वनपरिक्षेत्राधिकारी तलमले,सहा.अभियंता पुल्लरवार,कनिष्ट अभियंता सिंग व इतर अधिकारी उपस्थित होते.यावर्षी परिसरात पाऊस कमी पडल्याने २५० ते ३०० हेक्टर जमीन पडीक असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास पुनम झाडे यांनी आणून दिले.तसेच गोसीखुर्दचे पाणी कोकलपार तलावात सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मदत होणार असल्याचे पटवून दिले.यावर विभागीय वन अधिकारी सोनकुसरे यांनी तात्काळ प्रस्ताव दुरुस्त करून सादर करावा असे गोसीखुर्दच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.यावेळी भैय्याजी देशमुख माजी सरपंच, भास्कर गोवर्धन व नितेश खेडेकर उपस्थित होते.