क्षत्रिय मरठा कलार समाज द्वारे नवरात्र गरबा -दांडिया चे आयोजन 

0
14

गोंदिया,दि.24 – क्षत्रिय मरठा कलार समाज च्या महिला संगठन व नवयुवक संघठन  यांच्या संयुक्त वतीने  दिनांक 21 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत दररोज सायंकाळी 6 से रात्री 12 वाजता पर्यंत नवरात्र गरबा -दांडिया उत्सवाचे आयोजन बाजपेई वाॅर्ड स्थित क्षत्रिय मरठा कलार समाज भवन येथेे करण्यात आले आहे. या गरबा-दांडिया उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन समाजाचे वरिष्ठ सदस्य सुरेश चैरागडे यांच्या हस्ते सौ. दिव्या पारधी(भगत) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी महिला मंडळ द्वारे शानदार,मनमोहक विविधांगी प्रकारे गरबा व दांडिया नृत्य प्रस्तुत करण्यात आले. या गरबा-दांडिया उत्सव समारोपानंतर 30 सप्टेंबरला खासदार नाना पटोले यांच्या खासदार निधीतून समाज भवन विस्तारिकरणचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता  क्षत्रिय मरठा कलार समाजाचे अध्यक्ष मनिष चैरागडे, उपाध्यक्ष निलकंठ सिरसाटे, सचिव धर्मेंद्र धपाडे, नारायण कावळे, राजकुमार धुवारे, राजेंद्र डहाके कार्यकारिणी सदस्य किरण पालेवार, चमनभाउ बिसेन, मनोज डोहरे, दिलीप धपाडे, माणिक बिजेवार,अरविंद धपाडे, लोकेश भोयर, अमरदास डाहाके, महाप्रकाश बिजेवार, किरण पालेवार, यशवंत कावळे व समाजच्या महिला मंडळ द्वारे प्रयत्न घेतले जात आहे.