तेढा-तुमसर परिसरातील ४२ विहिरी कोरड्या

0
10

गोरेगाव,दि.26- तालुक्यातील तेढा-तुमसर येथील ४२ विहिरी भर पावसाळ्यात कोड्या पडल्या आहेत. याच परिसरातील खोसेटोला व आडकुटोला या गावांची स्थिती देखील तुमसर सारखीच आहे. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.अजून संपूर्ण उन्हाळा शिल्लक आहे. आताच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय स्थिती असणार अशी चिंता येथील गावकºयांना सतावू लागली आहे.यावर मात करण्यासाठी ही गावे जलयुक्त शिवारमध्ये सहभागी करावे असे मुकेश अग्रवाल यांनी म्हटले आहे.
गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथे खाजगी ३७ तर ५ शासकीय अशा ४२ विहिरी आहेत. यापैकी ४० विहिरी सप्टेंबर महिन्यातच पूर्णत: कोरड्या आहेत. एका विहिरीमध्ये १ फुट तर दुसºया विहिरीमध्ये दीड फुट पाणी आहे. २६ खासगी बोरअवेल असून त्या सर्व कोरड्या आहेत. ही स्थिती खोसेटोला व आडकुटोला येथील आहे. तेथील २६ खासगी व दोन शासकीय विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. परिणामी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सुरूवातीला याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पाणी टंचाईची गावकºयांची ओरड वाढल्यानंतर गोरेगाव येथील तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी या गावांचा दौरा करुन अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे.