जि.प.; मुकाअसह अधिकाèयांच्या कक्षाशेजारीच घाण…!

0
11

जिल्हा प्रशासन म्हणजे ङ्कलोका सांगे ब्रम्हज्ञान…ङ्क
हेच का तुमचे आयएसओ मानांकनः नागरिकांचा सवाल

गोंदिया,दि २७(खेमेंद्र कटरे)-; स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या सारख्या मोहिमांमध्ये जिल्ह्याचे नाव गाजविणाèया गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाèयांना घाणीमध्येच राहणे आवडते, असे कोणी म्हटल्यास हसण्यावारी नेऊ नका. होय! कोट्यवधींचा चुराडा करून लोकांना स्वच्छतेचा डोस पाजणाèया अधिकाèयांना त्यांच्या कक्षाशेजारी घाण असलेली आवडते. मग अशा अधिकाèयांना आपल्या अधिनस्थ अधिकाèयांना स्वच्छतेचे धडे देण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. जि.प.चे प्रशासन म्हणजे केवळ ङ्कलोका सांगे ब्रम्हज्ञान…ङ्क या प्रकारात मोडत असल्याचे चित्र असून हीच काय आमची आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद, असे उपहासात्मक टीका सर्वत्र केली जात आहे.
गेल्या दोन दशकापासून पुरोगामी महाराष्ट्रात स्वच्छतेच्या नावावर अनेक अभियान राबविले जात आहेत. अगदी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापासून तर आताच्या स्वच्छ भारत अभियानापर्यंत जिल्ह्यातील अनेक गावांना नेत्रदीपक यश संपादन केले. नागरिकांच्या बळावर गोंदिया जिल्हा परिषदेचा सुद्धा राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा सन्मान करण्यात आला. एवढेच नव्हे तर राज्यातील स्वच्छता अभियानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दखल घेतली गेली, हे विशेष. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य आहे.
या अभियानाच्या यशस्वितेसाठी लोकशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. यासाठी मेळावे, चित्ररथ, प्रदर्शन, सहली यांचेवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली. गावेच्या गावे निर्मल करण्यात आली. या सफलतेमुळे डोक्यात हवा शिरलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चक्क जिल्हा परिषद आयएसओ करून टाकली. मात्र ,यात जि.प. च्या प्रशासकीय इमारतीत आता अस्वच्छतेने कळस गाठल्याचे दिसत आहे.
27 Sept 19ज्या जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला जातो, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत लाखो रुपये दुरुस्तीच्या नावावर खर्च करणाèया अधिकाèयांसह पदाधिकाèयांना मात्र सभागृहासह सीईओ,डेप्युटी सीईओ यांच्या कक्षाशेजारील शौचालयाची झालेली दैनावस्था मात्र दिसत नसल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. स्वतःच्या ङ्कदिव्याखाली अंधारङ्क आणि ङ्कअतिरिक्त मुकाअ मुकाअ निघाले लोकांना ज्ञान पाजळायलाङ्क अशी अवस्था आहे. आयएसओ प्रमाणित जिल्हा परिषद मात्र अद्यापही हागणदारीमुक्त होऊ शकली नसल्याचे आश्चर्य आहे. जि.प.अध्यक्षांसह सीईओनी ३१ मार्च पर्यंत जिल्हा हागणादारीमुक्त करण्याचा ङ्कफतवाङ्क काढून सहा महिने लोटले, मात्र जिल्हा तर दूरच राहिला, स्वतःच्या कार्यालयातील शौचालयाची घाण व qभतीवरील थुंकी सुद्धा हे स्वच्छ करण्याचे शहाणपण कोणालाही कसे सुचले नाही. त्यामुळे अध्यक्ष,सीईओ,अ‍ॅडिशनल सीईओ व स्वच्छता विभागाच्या डेप्युटी सीईओच्याच ङ्कदिव्याखाली अंधारङ्क, असे म्हणण्याची वेळ आली आहे. उल्लेखनीय म्हणजे संपूर्ण स्वच्छता विभागात एकाहून एक असे तज्ज्ञ गेल्या काही वर्षापासून ठाण मांडून बसले आहेत. यावरून या तज्ज्ञांनी आतापर्यंत काय दिवे लावले, याचा सहज अंदाज कोणीही बांधू शकतो. अशा तज्ज्ञांची साधी विचारपूस सुद्धा एकाही अधिकाèयाने केली नाही, अन्यथा त्या विशेष तज्ज्ञांचा कारभार सुद्धा चव्हाट्यावर येण्यास वेळ लागला नसता. परंतु, दोन चार अधिकारी-पदाधिकारी यांची जी हुजूरी आणि दोन चार पत्रकारांशी हाय हॅलोचे संबंध ठेवून आपणच सर्व करीत असल्याची दाखविण्यात हातोटी असलेल्यांमुळेच जिल्हा परिषदेचा संपूर्ण स्वच्छता विभाग नापास झाला आहे, हे दुर्दैव आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठकी हजर लोकांना जलपान केल्यानंतर कधीही स्वच्छता केली जात नाही. गेल्या आठवड्यापासून या सभागृहातील टेबलामध्ये नास्ताची प्लेट व चहाचे कप जसेच्या तसे बघावयास मिळाले. यावरून प्रशासनाचे थेट दुर्लक्ष असल्याची जाणीव होते. किमान सीईओ याकडे लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करतात की पाठबळ देतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ व अ‍ॅडिशनल सीईओ यांच्या कक्षाशेजारी सुद्धा एक कर्मचाèयासाठी शौचालय व मुत्रीघराची सोय आहे. तिथे छतातून गळणारे पाणी आणि मुत्रालयातील बेसीनला नसलेले नळ, टोट्या हात धुण्यासाठी नसलेली व्यवस्था वह्र्याड्यात साचलेले घाण पाणी अशी अवस्था पाहून गावखेड्यात जाऊन हातात झाडू धरून लोकांना ज्ञान देणारे सीईओ व एडी.सीईओसह इतर अधिकारी आपल्याच इमारतीत कसे राहतात, याचे दर्शन होते. जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाशेजारी असलेल्या शौचालय परिसरातही सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. साफसफाईसाठी कर्मचारी असताना कार्यालयाच्या परिसर स्वच्छतेकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे. नळ दुरुस्ती करणारा प्लंबर हा कार्यकारी अभियंता,सीईओ व एडी.सीईओचा खास झाल्याने त्याने हे काम कधी केलेच नाही. परंतु, टेंडर क्लर्कची कामे करून चंद्रावर घर घेण्याची तयारी मात्र करीत आहे. जि.प.चे परिसर स्वच्छता व साफसफाईसाठी पाच कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, केवळ कार्यालयासमोरील बाजूंचीच तेवढी स्वच्छता केली जाते. इमारतीच्या मागील परिसराकडे मात्र दुर्लक्ष आहे. सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग कार्यालयाच्या मागे घनकचरा मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यादेखील जिल्हा परिषदेची शान वाढवीत आहेत. साहजिकच अशा घृणास्पद प्रकारास कोण कारणीभूत आहे, याचा प्रशासनाने विचार करण्याची आज खरी गरज आहे.