बेरार टाईम्सचा दणका,सीईओंनी केली कार्यालयासह शौचालयांची पाहणी

0
18

गोंदिया,दि २७(खेमेंद्र कटरे)-; स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या सारख्या मोहिमांमध्ये जिल्ह्याचे नाव गाजविणार्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील अस्वच्छता व शौचालयांच्या वाईट अवस्थेचे वृत्त बेरार टाईम्सने आज 27 सप्टेंबरच्या अंकात जि.प.; मुकाअसह अधिकाèयांच्या कक्षाशेजारीच घाण…! या मथळ्याखाली प्रकाशित करताच जिल्हा परिषद प्रशासनात चांगलीच खळबळ माजली.

खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सकाळी 10 वाजता कार्यालयात पोचल्यानंतर सर्व विभागांच्या कार्यालयालांना तसेच वरहांड्यातील शौचालय,मुत्रीघरांची पाहणी करुन विभागप्रमुख व संपुर्ण स्वच्छता विभागाच्या चमूला कामाला लावले.सीईओ ठाकरे यांनी वृत्ताची दखल घेत सर्व विभागप्रमुखांना आपआपले कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याचे तसेच रेकार्ड व्यवस्थित करण्याचे निर्देश दिले.सोबतच सर्व विभागातील बसण्याची व्यवस्था आणि सध्या स्थितीत असलेल्या अस्तव्यस्त साहित्यांचे सर्व छायाचित्रण करुन त्याचे सादरीकरण करण्याचे निर्देश संपुर्ण स्वच्छता विभागाला दिले.IMG_20170927_132600

त्यानुसार संपुर्ण स्वच्छता विभागाचे कर्मचारी प्रशासकी इमारतीमधील कार्यालयाचे छायाचित्रण  करु लागले होते.तर सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत सर्व कार्यालयच व्यवस्थित करण्यात मग्न झाले होते.बेरार टाईम्समधील प्रकाशित वृत्तानंतर अनेक कर्मचारी व काही अधिकार्यांनी शौचालय व मुत्रीघराच्या स्थितीचे सीईओसमोर  चित्रण केल्याबद्दल आभारही मानले.सोबतच बांधकाम विभागातील ज्या प्लंबरकडे शौचालयाचे नळ व इतर देखरेखीची जबाबदारी आहे,त्या कर्मचार्यांने आपल्या कामात हयगय केल्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवे असा सूरही व्यक्त केला आहे.