येरंडी/दर्रे ग्रापं अविरोध,सरपंचासह सदस्याही महिला

0
12

अर्जुनी मोरगाव,दि.07- तालुक्यातील 39 ग्रा.पं.च्या निवडणुका येत्या 16 ऑक्टोंबरला होत असून गोठणगाव व येरंडी/दरॆ या दोन्ही आदिवासी नक्षलप्रभावीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका मात्र अविरोध पार पडल्या आहेत.विशेष बाब म्हणजे येरंडी/दरे या ग्रामपंचायती मधे सरपंचासह सात ही महिला सदस्य अविरोध निवडणूक आल्याने गोंदिया जिल्ह्यातील पहिली महिला ग्रामपंचायत ठरली आहे.यामध्ये सरपंचपदावर मनिषा प्रकाश शहारे यांची अविरोध निवड झाली आहे.त्यांच्यासोबतच सदस्यामध्ये सोनिया तुलाराम वाढई,नंदा संदिप जुनाके,गिता हेमराज वाढई,बेबीबाई खेमराज मारगाये,मंदा प्रशांत शहारे,पारबता भिरी व जिजा सुनिल सोनवाने यांची निवड झाली आहे.