पांदण रस्त्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढणारा कोमल कटारे 55 तासानंतर उतरला

0
8

गोंदिया,दि.8 – शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतक-याने शुक्रवारच्या सकाळी 7 वाजता पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करित आत्महत्या करण्याचा इशारा दिला.आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याने तब्बल 55 तास तो पाण्याच्या टाकीवरच राहिला.प्रशासनाला त्याला समजविण्यात आलेले अपयश हे गोरेगाव तहसिलदाराच्या कार्यप्रणालीचे अपयश मानले जात आहे.शेवटी आज रविवारला सायकांळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी घटनास्थळी न जाता भ्रमणध्वनीवर आंदोलनकर्त्यांशी बोलणी करुन 3 मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोमल कटारे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

त्यामध्ये कोमल कटारे यांच्या शेताकडे जाणारा रस्ता त्वरीत पुर्ववत करुन देणे,शासनाची 14 आर जमीन शासनदरबारी जमा करणे व तिसरी मागणी गेल्या तीन चार वर्षापासून रस्ता अडविल्याने जमिन पडीक राहिल्याने त्याचा मोबदला त्वरीत सर्वेक्षण करुन देणे या मागण्या जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्याने कटारे यानी शेवटी आपले आंदोलन मागे घेतले.तर दुसरीकडे ज्या द्वारकाप्रसाद दमाहे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन रस्ता अडविला होता,त्याने स्वतःविष प्राशन करुन प्रशासनाला जेरीस आणण्याचे काम केले होते.त्यामुळे जिल्हाप्रशासनाची चांगलीच नाचक्की याप्रकरणात झाली.दमाहे यांची प्रकृती स्थिर झाली असून जिल्हा रुग्णालयाने त्यांना सुट्टी दिली आहे.

गोरेगाव तालुक्याच्या भडंगा येथील वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणाºयांना हटविण्यास गेलेल्या नायब तहसीलदाराला धमकी देत त्यांच्यासमोर विष प्राशन केले. या संदर्भात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता आरोपी ज्ञानेश्वर यशवंतराव दमाहे (३८), निवृत्त यशवंतराव दमाहे, दीपक यशवंतराव दमाहे, किशोर यशवंतराव दमाहे व दमाहे कुटुंबातील दोन महिला अशा सहा जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. नायब तहसीलदार नरेश महादेव वेदी (५३) यांच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम २४३, १४६, ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.