खा.पटोलेंची एसटी कर्मचार्यांच्या मंडपाला भेट

0
12

साकोली,दि.18 : एस.टी. कर्मचाºयांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला खा. नाना पटोले यांनी आपला पाठिंबा दर्शविला अून जनतेनेही या संपाला आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केला आहे. ते साकोली येथील बसस्थानक एसटी कर्मचाºयांच्या मंडपाला भेट दिली. संघटनेच्या पदाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून कर्मचाºयांच्या अडचणीसंबंधी चर्चा केली. एसटी महामंडळ हा सध्या तोट्यात नसून नफ्यात आले व हा नफा स्वच्छता अभियानाच्या नावावर खर्च होत आहे. यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी पैसा खर्च करण्यात येत आहे. याची चौकशी करण्यात यावी. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एस.टी. कर्मचाºयांचे पगार कमी आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यास अडचण येत आहे. राज्य शासनाने एस.टी. ला टोलमुक्त करावे तसेच कर्मचाºयांचे वेतन वाढवावे, अशी माहितीही यावेळी नाना पटोले यांनी केली आहे. एस.टी. महामंडळात जुने टायर रीमोल्डीग करून वापरतात व नवीन टायर खरेदीचे बिल जोडण्यात येतात. तसेच डिझल हे बाहेरून भरले जातात याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खा. पटोले यांनी यावेळी केली.