अहेरीतील एसटी कामगार सरकारशी लढाईला तयार

0
9

आलापल्ली,दि. 20: संपावर असलेल्या एसटी कामगारांच्या मागण्या मान्य करण्याएेवजी राज्य शासनाकडून हा अांदोलन मोडीत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात अाहे. याला न घाबरता पुढील लढा रस्त्यावर उतरुन लढला जाईल व यामुळे होणा-या नुकसानाची जबाबदारी शासनाची राहिल असा इशारा अहेरी आगार कृती समितीकडून देण्यात आला आहे.यावेळी कृती समितीचे महेबुब खाँ पठान, मेघराज बगसरे, नवनाथ घायाळ, आसीफ कुरेशी, महेश थोरात, सुधाकर तोडासे, कु. मयुरी गोर्ले, कु. स्नेहा चांदेकर, चम्पक ठाकरे, सुनिल बडवे, सुरेश जोरीगलवार, किशोर गट्टुवार, सुभाष चवले, रमेश आत्राम, दौलत मडावी, महादेव डोने, तुकाराम बोराडे, दशरथ रत्ने, दीपक कोरेत, प्रवीन पेद्दीवार, मानिक वरसडे या कृती समितीच्या पदाधिका-यासह सह संपुर्ण एसटी कामगार उपस्थित होते.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, २०१६ पासुन सातवा वेतन आयोग लागु करणे, वार्षीक बोनस, २०१६ पासुन ११% वाढीव वेतन भत्ता यासोबत इतर काही मागण्या मंजुर करण्याची राज्य परिवहन माहामंडळाच्या कामगारांकडून मागील काही वर्षा पासुन करण्यात येत आहे. वाढती महागाई लक्षात घेता राज्यातील प्रवाशांची रात्रंदिवस सेवा करणा-या या कामगारांच्या मागण्या मान्य केले जाईल अशी अपेक्षा होती. पण शासनाकडून मराठी भाषा दिन साजरा करायला १०० कोटी, बस स्टँड स्वच्छ करायला ४४६ कोटी, बस मध्ये वाय फाय बसवायला १८०० कोटी, शिवशाही बस खरेदी करायला प्रति बस ३६ लाख, मुखमंत्री सहायता निधी साठी ५ कोटी, असे अब्जावधी रुपये खर्ची घातले जातात. पण ज्या कामगारांनी हे एेश्वर्य निर्मान केले त्यांना निधी नसल्याचे खोटे सबब पुढे करुन नागविले जात असल्याचे बघुन एसटी कामगारांनी १७ अाँक्टोबर पासुन राज्यव्यापी संप पुकारला.

याची तरी दखल घेऊन शासनाकडून कामगारांच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा होती. पण ती देखील फोल ठरली. शासनाने कामगारांच्या परिश्रमाची कदर तर केली नाही. उलट हा संप मोडीत काढण्यासाठी विवीध माध्यमाने दबाव निर्माण केला जात अाहे. यावर कामगारांत रोष निर्माण झाले असुन कामगार आता ”अारपार”चा लढा देण्याच्या मुडमध्ये आले अाहे. रस्त्यावर उतरुन लढण्याचा संकल्प कामगारांनी केला आहे. या अनुरुप येत्या रविवारला अहेरी तर सोमवारला आलापल्ली बंद पाडण्यात येईल. त्यानंतरही मागण्या मजुर न झाल्यास विविध मार्गावर ”चक्का जाम” आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखील कृती समिती कडून देण्यात आला.