तिरोडा तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

0
12

गोंदिया,दि.21 जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील सोनेखारी येथे गुरूवारी दुर्योधन चुडामन वाढवे (३२)या शेतकºयाने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्योधनकडे चार एकर शेती आहे. त्याच्यावर जागृती पतसंस्थेचे १ लाख २५ हजार व युनियन बँकेचे ५० हजार आणि सेवा सहकारी संस्थेचे ५० हजार, मायक्रो फायन्सास आणि सावकाराचे ३० हजार असे एकूण ३ लाखांचे कर्ज होते. कर्जाची परतफेड कशी करायची याच विंवचनेत तो मागील काही दिवसांपासून होता. यातून दिवाळीच्या दिवशीच त्याने आत्महत्या केली.