बळीराजांचा इतिहास समाजापर्यंत पोचविणे गरजेचे -डॉ. बबनराव तायवाडे

0
10

नागपूर, दि.२०-: राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे प्रथमच बळीराजा गौरव दिन ,शोध इतिहासाचा सत्य संस्कृतीचा कार्यक्रम येथील लोकमत चौकात घेण्यात आला. बळीराजाचा इतिहास हा दानशूर,लोकशाही,नाविन्यपूर्ण कारभार होता. जातीभेद, वर्णभेद हे शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हते.इतिहास हा विसरुन चालणार नाही,त्याची आठवण आणि मिळालेली शिकवण ,हि भविष्याची वाटचाल ठरवीत असते असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शरद संघटक वानखडे,जिल्हाध्यक्ष पंकज पांडे, जिल्हा उपाध्यक्ष राजू खडसे,जिल्हा संपर्क प्रमुख आकाश जावळे,मध्य नागपूर अध्यक्ष शुभम वाघमारे, निलेश कोढे,उज्वला महल्ले,रोशन कुंभलकर,सौ. शरयू तायवाडे,सौ नंदाताई देशमुख,अरुणा भोंडे,निकेश पिणे,प्रशांत रिंके,नाना लोखंडे,कल्पना मानकर,विनोद हजारे,लाभेश ढोक,गोमासे,भास्कर भोंडे,मदन नागपुरे आदी उपस्थित होते.संजय पन्नासे यांनी आभार मानले