नवजात बालकाचा प्रसूती दरम्यान मृत्यू, दोषी डॉक्टर निलंबित

0
23
गोंदिया,दि.25ः- जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला रुग्णालय असलेला बाई गंगा बाई स्त्री रुग्णालय नेहमीच वादातीत राहिले आहे.या रुग्णालयातून नवजात बाळांचे चोरी होणे असो की,बालमृत्यूमुळे महिन्यातून अर्धेदिवस चर्चेत असणार्या या रुग्णालयात मंगळवारच्या रात्रीला डाॅक्टराच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती वेळेवर न झाल्याने पोटातच नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.याप्रकरणाने रुग्णालयातील कामकाज पुन्हा वादात सापडले असून शासकीय रुग्णालयांतर्गत असलेल्या या रुग्णालयातील प्रसुतीदरम्यान पैसे मागणार्या वैद्यकीय अधिकार्यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठातानी निलबिंत केले आहे. एका नवजात बालकाला प्रसूती दरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे. यात दोषी डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी रात्रभर रुग्णालयाच्या परिसरात बालकाचा मृतदेह रोखून धरल्या नंतर अखेर डॉक्टरवर कारवाई झाल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला.
 गोंदिया शहरातील शिल्पा मकरेलवार हि महिला रुग्णालयात प्रसूती करिता मंगळवारच्या सकाळी रुग्णालयात दाखल झाली.दुपारच्या सुमारास तिला असहनीय प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिने डॉक्टरला शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली. मात्र तिथे हजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.पलक अग्रवाल यांनी शस्त्रक्रियार करण्यासाठी आधी पाच हजार रुपये द्या अन्यथा सामान्य प्रसूतीची वाट बघा प्रसुतीसाठी दाखल महिलेच्या कुटूंबीयाने सांगितले. रात्री ७ वाजे दरम्यान बाळाची पोटातील हालचाल सुरु झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तेव्हा डॉ. पलक अग्रवाल यांनी शिल्पाला शस्त्रक्रिया गृहात नेले असता शिल्पाने एका गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र तो पर्यत त्याचा मृत्यू झाला होता. असे असून सुद्धा डॉ. अग्रवाल यांनी शिल्पाला तुमचे बाळ सुदृढ असल्याचे सांगून कुटूंबियांना मृत बालकच त्यांच्या हातात दिल्याने नातेवाईकांनी पोलिसात रात्री तक्रार दाखल केली.घटनेची माहिती मिळताच बसपचे गोंदिया भंडारा जिल्हा प्रभारी व माजी नगरपरिषद उपाध्यक्ष पंकज यादव यांनीही रुग्णालयात धाव घेतली आणि संबधित डाॅक्टरला निलबिंत करण्याची मागणी केली. जो पर्यंत दोषी डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यतं मृतदेह नेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे दोषी डॉक्टरवर कारवाई करून निलंबित करण्यात आले.