ओबीसींच्या मागण्यासांठी नागपूर ते दिल्ली लाँग मार्च काढणार-डॉ. बबनराव तायवाडे

0
23

नागपूर, दि.30:सरकारने ओबीसींच्या मागण्याकंडे लक्ष न दिल्यास ओबीसी समाज आपल्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे बघणार नाही.त्यातच क्रिमिलेयरची केंद्राने वाढवलेली मर्यादा राज्यसरकारनेही त्वरीत वाढवावी असे विचार व्यक्त येत्या काही काळात ओबीसींच्या मागण्यासांठी नागपूर ते दिल्ली अशा लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.

ते रविवारला धनवटे नॅशनल काॅलेजच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकित बोलत होते.बैठकिला प्रामुख्याने सचिन राजूरकर,शरद वानखेडे,शेषराव येळेकर,रुचित वांढरे,जैमिनी कडू,रेखा बाराहाते,अशोक जीवतोडे,तिवाडे आदी उपस्तिथ होते. सभेच्या सुरुवातीला नागपूर शहर कार्यकारिणी घोषित करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच विद्यार्थी व युवा अधिवेशन २० डिसेंबर रोजी घेण्याचे आवाहन रुचित वांढरे यांनी केले.
संपूर्ण ओबीसी संवर्गाला क्रिमिलियर मधून वगळण्यात यावे असे शेषराव येलेकर यांनी यावेळी मत व्यक्त केले.तर SC ST प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास सरकारने स्वाधार योजना त्वरित लागू करावी अशी भूमिका सचिन राजूरकर यांनी मांडली.

नागपूर ग्रामीण अध्यक्षपदी अवंतिका लेकुरवाळे,तर विद्यार्थी शहर उपाध्यक्षपदी धनश्री गोमासे यांची नियुक्ती करण्यात आली.सोबतच नागपूर शहर कार्यकारीणी गठित करण्यात आली.त्यामध्ये नागपूर शहर अध्यक्ष संजय पन्नासे,कार्याध्यक्ष शकील पटेल,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लोखंडे,मोतीलाल चौधरी,अतुल्ला खान,राजू ढेंगे, बी कुचांकर, संजय चकोले, भय्या रडके, नितीन देशमुख,ईश्वर ढोले,कांशीराम यादव,अशोक खरे,सचिव- विजय पटले, राजेश रानेवास,रा.बांते, प्रकाश बोबडे,आरिफ अन्सारी,नितीन देशमुख,जावेद अन्सारी,सुनील मागरे, रवी तायडे,निलेश खोरगडे,मंगेश वाघ,रमेश पाटेकर,नांदू वैद्य,विवेक सपकाळ,शशिकांत खरात,पराग वानखडे,मनोज बालस्कार,आतिक कुरेशी,अविनाश पोळे,प्रशांत धाकुलकार, अविनाश कोकडे,मंगेश पांगुळ,अमोल वाकोडीकर,गणेश नाखले,अतुल बालबुद्धे,मंगेश सावरबांधे,सुनील जवंजाळ,जयकुमार क्षीरसागर,राजेंद्र पाटील,नितीन साळवे,राजेश बावनकुळे, विनोद ढोबळे,राजेश घोरमाडे, नरेंद्रा धातरक, ईश्वर बुद्धे,तुकाराम परिहार,अरुण भोपले, गोविंद वरवाडे,विनोद ढोले,भरत पुरे,शाहिद राजा.
कोषाध्यक्ष-प्रकाश भोयर,सहसचिव-प्रदीप काकडे,सुधाकर तायवाडे, श्रीकांत खरडे, निशांत डुंबरे,दीपक पिलारे, सुनील काळे,राजू लोहे, माधवराव चन्ने,विकास लाखे,रमेश कोलते,प्रशांत रिंके,प्रतीक सपाटे,रमेश आरसे,ओम परिहार,बबलू ठाकरे,मिलिंद भोकारडे, दिलीप देशमुख,सतीश गावंडे,बाळू मोरे,रवी येनूरकर,उदय सांबारे,राजू राऊत,अरविंद शिंदे,राजेश सराट, दिलीप ढोक,सुभाष धोटे,बाबूलाल धोत्रे आदींची निवड करण्यात आली. ओबीसी साहित्य क्षेत्रात -बळवंत भोयर,सुरेंद्र बुराडे यांची निवड करण्यात आली.बैठकीला उपस्तिथ पंकज पांडे,राजू खडसे,आकाश जावळे,निलेश कोढे,शुभम वाघमारे,अजिंक्य देशमुख,रक्षणधा,उदय देशमुख,नंदा देशमुख,अनिता ठेंगरे,भास्कर भोंडे,प्रशांत रिंके,अरुणा भोंडे उपस्थित होते.