राणेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या हालचालींना वेग

0
14
मुंबई,दि.30- माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा मंत्रिमंडळ समावेश करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी आज ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी याविरोधात राणे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे अशांना मंत्रिमंडळात कसे घेता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल’, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजप राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशावर ठाम आहे. त्यामुळे काय होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.