नव्या पेंशन योजनेच्या विरोधात महसूल कर्मचार्यांचे एकदिवसीय आंदोलन

0
23

गोंदिय,दि.१: राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर2005 रोजी काढलेला शासन निर्णय बेकायदेशीर असून हा निर्णय रद्द करुन जुनी पेंशन योजना लागू करावी या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघनेच्यावतीने जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आज१ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून काम केले.गोंदियात या आंदोलनादरम्यान महसुलच्या कर्मचार्यांनी रक्तदान करुन शासनाकडे आपला आक्षेप नोंदविला.
राज्य शासनाने 31 आॅक्टोबर २००५ रोजी शासन निर्णय काढून जुनी पेंशन योजना बंद करुन नवीन अंशदान पेंशन योजना अस्तित्वात आणली. तसेच त्या निर्णयानुसार समाज काम करणार्या कर्मचार्यांना दोन विभागात वाटण्यात आले. या निर्णयानुसार कर्मचार्यांसाठी भविश्यात कोणत्याही प्रकाची सुरक्षा अथवा संरक्षण राहणार नसून अंशदायी पेंशन योजनेत होणार्या कपातीनुसार पेंशन मिळणार आहे. सरासरी विचार केल्यास अत्यंत तोकड्या स्वरुपात ही पेंशन राहणार असून इतर लाभापासूनही कर्मचाऱ्यांना या निर्णयापासून वंचित रहावे लागतणार आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय रद्द करुन जुनीच पेंशन योजना लागू करावी, या मुख्य मागणीला घेवून जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचार्याने  कार्यालयात काळ्या फिती लावून काम करीत आंदोलनात सहभाग घेतला. सदर आंदोलनात  गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्रात राज्य महसुल कर्मचारी संघटना गोंदिया,जुनीपेंशन हक्क संघटन,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती,मागासवर्गिय कर्मचारी संघटना,पुरोगामी शिक्षक संघटना इत्यादी संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी काळ्या फिती लावून भिक मांगो आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी अनोख्यांनी आंदोलनादरम्यान 30 महसुल कर्मचायानी रक्तदान केले,त्यामध्ये 6 महिलांचा समावेश आहे.

IMG-20171101-WA0033आंदोलनात राजेश मेनन,राकेश डोंगरे,अमोल पाटणकर,लिलाधर पाथोडे,पी.जी.शहारे,विरेंद्र कटरे,राजू धांडे,एस.यु.वंजारी,हरिराम येरणे,आशिष रामटेके,एम.सी.चुर्हे,मलेवार,लिल्हारे,राजेश बोडखे,सुनिल राठोड,विवेक बाभरे,सचिन राठोड,लोकेशसिंह हिरापूरे,चंदू दुर्गे,भूषण लोहारे,सचिन धोपेकर,महेंद्र चव्हाण,सुभाष सोनवाने,शालिक कठाणे,राजेश बिसेन,सुनिल चौरागडे,जयेश लिल्हारे,राजू कडव,सतिश दमाहे,देव झलके,पाथोडे,मनिष बलभ्रदे,किर्तिमंत चांदेकर,रामेश्वर घोनाडे,चिंतामन वलथरे,हेमंत पटले,नितू दुर्गे,निराशा शंभरकर,ममता ठकरेले,कांता साखरे आदी महिला कर्मचारी सहभागी झाले होते.