समाज विकासासाठी राष्ट्रसंतांची शिकवण अंगिकारा- आ. रहांगडाले

0
26

तिरोडा,दि. 3 :राष्ट्रसंत तुकडोजी महराजांनीजनतेला राष्ट्रसंताचे विचार अंगीकरण्यास प्रवृत्त केले तसेच ‘माणूस द्या मज माणूस द्या’ या उक्तीप्रमाणे नेहमी समाजामध्ये अंधर्शद्धा, व्यसनमुक्ती वाईट चालीरिती दूर करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या विचारामुळे समाजविकास होण्यास खूप मदत झालेली आहे. तसेच आधुनिक युगामध्ये बहुतांश समाजामध्ये व्यभिचारी भावनेचा विकास होवून माणूस त्यांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. याकरिता व्यभिचारांवर मात करण्यासाठी राष्ट्रसंताची विचार अंगिकारणे आवश्यक असल्याचे मत तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले.
ते तालुक्यातील नवेगाव/खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र बावनकर महाराज आळंदी, कृउबास संचालक दीपक पटले, सरपंच मंदा कुंभरे, नवनिर्वाचित सरपंच मिनल पटले, उपसरपंच बुगन गौतम, तंमुस अध्यक्ष बंसीधर पटले, गुरुदेव सेवा समिती अध्यक्ष घनश्याम पटले, सदस्य रामदास पटले, लहाणु निशाने, गुलाब पटले, कौशल्या पारधी, प्रेमलाल पटले, जुगल पटले, गुड्डू पटले, राजू भांडारकर, भाऊराव पटले, घनशाम पटले, मंगरु पटले, राधेलाल पटले उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. रहांगडाले म्हणाले, ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकासाचे मार्ग स्पष्ट होत आहेत. अशा राष्ट्रसंतांच्या विचाराची स्पष्टोन्नती आपल्याला ग्रामस्वच्छता, गोदरीमुक्त गाव, या माध्यमातून स्पष्ट दिसत आहे. तसेच कित्येक गावांनी यामध्ये पुढाकार घेवून आपल्या गावाला विकासाच्या मार्गाने सुद्धा नेल्याचे स्पष्ट होते. गावाचा विकास करायचा असेल तर माणसाने सर्वप्रथम स्वत:चा विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले.