एकोडीच्या तंमुस अध्यक्षासह युवकांचा भाजप प्रवेश

0
14

तिरोडा,दि.04ः गोंदिया तालुक्यातील पण तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या एकोडी येथील अनुसुचित जातिच्या नवयुवकांनी तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.आमदार विजयभाऊ राहांगडाले यांच्या कार्याला पाहुण व पार्टीच्या विचारावर विश्वास ठेवत महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिति अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, चर्मकार समाजाचे अध्यक्ष विनोद बरियेकर, महेंद्र कनोजे व विशाल कनोजे यांनी प्रवेश केले.पक्षाला मजबूत व संघटनेला वाढविण्यांचे काम करण्याचे आश्वासन नवयुवकांनी आमदार विजयभाऊ राहांगडाले व विष्णुदयाल बिसेन यांना दिले.