नव्या पेंशनसह बदल्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिक्षकांचा मोर्चा

0
12

गोंदिया,दि. 3 : नवी पेंशन योजना बंद करुन जुनी पेंशन योजना लागू करण्यासोबतच बदली धोरण आणि शिक्षकविरोधी धोरणाच्या विरोधात आज ४ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना,माध्यमिक शिक्षक संघटनेसह इतर शिक्षक संघटनानी फूलचूर येथून भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयाव धडक दिली.त्यानंतर मोर्च्याचे रुपांतर जाहिर सभेत करण्यात आले.या सभेत सर्वच शिक्षक संघटनेच्यान नेत्यांनी सरकारच्या धोरणांचा कडाडून विरोध केला.तसेच संघटना कितीही असल्या तरी शिक्षक हक्कासाठी सर्व शिक्षकांच्या संघटना या एकत्र येऊ शकतात हे आजच्या मोर्च्याने सिध्द झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या. मोर्च्याचे नेतृत्व विरेंद्र कटरे,मनोज दिक्षीत, बांगरे,एल.यु.खोब्रागडे, नानन बिसेन,डी.टी.कावळे,शेषराव येलेकर,किशोर डोंगरवार, एल. एफ. गिर्‍हेपुंजे,शंकर चव्हाण, मनोज दीक्षित, यशवंत परशुरामकर, व्ही.डी. मेश्राम, रेशीम कापगते, देशराज रहांगडाले, जितेंद्र बरडे, विनोद जांभुळकर, महेंद्र सोनवाने, प्राजक्ता रणदिवे, जी. टी. भोयर, एन.आर. ठाकरे, ओ.वाय. डहाके, बी.एफ. बालपांडे, आशिष रामटेके,अय्युब मेमन,अनिरुध्द मेश्राम,गणेश चुटे,अरुण कटरे,लिकेश हिरापूरे,केदार गोटेफोडे,किशोर रहागंडाले,यशोधरा सोनवने,मोरेश सुर्यंवशी आदी शिक्षक  व इतरांनी केले.
राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण व शिक्षकविरोधी धोरण राबविले जात आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना शिक्षकाच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामात गुंतवून जिल्हा परिषद शाळा बंद व्हाव्यात, असे धोरण आखल्या जात आहे. या वर्षात वर्षभर बदलीचे धोरण सुरू ठेवून शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण केल्या जात आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होत आहे.
तेव्हा शिक्षकांवर केल्या जात असलेल्या अन्यायाविरोधात व अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी, २३ ऑक्टोबर २0१७ चा वरिष्ठ श्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणी लागून करण्याबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा, मुख्याध्यापक व शिक्षकांचे ऑनलाईन काम बंद करून स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, २७ फेब्रुवारी २0१७ च्या बदली धोरणात बदल करून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे, एमएससीआयटीची वसूली कायस्वरुपी बंद करण्यात यावी, शालेय पोषण आहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, निधीची व्यवस्था नियमित करण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.या मोर्च्यात जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते.