पालकमंत्र्यांच्या हस्ते संकल्प समतेचा घडिपुस्तिकेचे विमोचन

0
7

गोंदिया,दि.४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकल्प समतेचा या घडिपुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नवेगावबांध येथे ३ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे उपवनसंरक्षक एस.युवराज, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य मंदा कुमरे, पं.स.सदस्य सर्वश्री होमराज कोरेटी, रामलाल मुंगनकर, प्रेमलाल गेडाम, श्रीमती अर्चना राऊत, तहसिलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.खान, श्री.रहांगडाले, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.