तहसील कार्यालयात धामनेवाडावासियांचा ठिय्या

0
10

गोंदिया,दि.08 :तालुक्यातील धामनेवाडा (एकोडी) येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीेत विजयी उमेदवारास पराभूत व पराभूत उमेदवाराला विजयी दाखविल्याच्या प्रकरणावरुन मंगळवारी गोंदिया तहसील कार्यालयात उमेदवारांसहीत शेकडो महिला-पुरुषांनी रात्रीच्या सुमारास पोचून ठिय्या आंदोलन केले. मात्र तहसीलदार सुट्टीवर गेल्याने गावकºयांत रोष दिसून आला.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल १७ आक्टोबर रोजी जाहीर झाले. यात महेंद्रकुमार भदाडे व मालता कोकुडे यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाºयांनी ४ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या विजयी उमेदवारांच्या यादीत पराभूत झालेल्या दिक्षा ईळपाते व मदन रहांगडाले यांचे नाव असल्याने गावातील जनतेचा आक्रोश वाढला आहे.
गावातील विजयी उमेदवार महेंद्र भदाडे व मालता कोकुडे सहित प्रमुख नागरिकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाण्यात न्याय देण्यासंबंधी निवेदन दिले. मंगळवारी तहसीलदार व जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याकरिता गोंदिया येथे शेकडो गावकरी आले. विशेष म्हणजे, धामनेवाडाचे प्रकरण गंभीर असतानाही तहसीलदार सुटीवर गेल्याने प्रकरणाला घेऊन विविध प्रकारच्या शंका-कुशंकांना पेव फुटत आहे.