देवरी येथे प्रजासत्ताकदिन सोहळा थाटात

0
11

छाया-null स्थानिक क्रीडासंकुलाच्या मैदानावर आयोजित शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करताना उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने. (छाया- सुरेश भदाडे)

देवरी- संपूर्ण तालुक्यात देशाचा ६६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. देवरीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ध्वजारोहण केले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन शि. राजमाने, तहसीलदार संजय नागतिळक प्रामुख्याने हजर होते. प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला सर्व विभागांचे विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी, नागरिक, वकील, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होेते. यावेळी शालेय विद्याथ्र्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी एस एम मेश्राम, उपसभापती लक्ष्मण सोनसर्वे यांच्या उपस्थितीत सभापती कामेश्वर निकोडे यांनी ध्वजारोहण केले. तहसील कार्यालय येथे तहसीलदार संजय नागतिळक, पोलिस मुख्यालय परिसर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने, वनविभाग कार्यालयात वनपरिक्षेत्राधिकारी रोशन राठोड, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांचे हस्ते वीज उपकेंद्र देवरी येथे, ग्रामपंचायत कार्यालयात प्रभारी सरपंच कृष्णदास चोपकर,तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ताकृअ अविनाश कोटांगळे, आ.सं.ह.पुराम यांचे हस्ते छत्रपती शिक्षण संकुल येथे ध्वजारोहण करण्यात आले. फुटाणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जि.प.सदस्य राजेश चांदेवार, मुल्ला आरोग्य केंद्रात जि.पच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांचे हस्ते, लोहारा आँग्ल औषधालयात सुनील शुक्ला यांचे हस्ते, मुल्ला येथे सरपंच भोजराज घासले यांचे हस्ते, वडेगाव येथे सरपंच राजकुमार रहांगडाले यांचे हस्ते, ओवारा येथे कमल येरणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी शालेय विद्याथ्र्यांनी प्रभात फेèया काढून सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सादर केले. तालुक्यात यावेळी अनेक ठिकाणी ग्रामसभांचे आयोजनही करण्यात आले होते. या ध्वजारोहण सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येन हजर असल्याचे वृत्त आहे.