अर्जूनी मोरचे तहसिलदार बोंम्बार्डे निल़बित,येरंडी प्रकरण भोवले

0
9

गोंदिया ,दि.९: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे तहसिलदार डी.सी.बोम्बार्डे यांना मतदार यादीत नाव समाविष्ट न करता मतदार यादी प्रकाशीत केल्याच्या कारणावरून  विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी आज 9 नोव्हेंबरला तत्काळ प्रभावाने निलबिंत करीत त्यांना निलबंन काळात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय हे मुख्यालय दिले असून त्यांच्या जागी सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी सी.आर.भंडारी यांची नेमणुक करण्यात आली आहे.

अर्जूनी मोर तालुक्यातील येरंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी 59 लोकांनी आपले नाव समाविष्ट करण्यासाठी सहा. मतदार नोदंणी अधिकारी तथा तहसिलदारकडे अर्ज केले होते. परंतु त्या अर्जावर लक्ष न देता यादी प्रकाशीत केल्याने राज्य निवडणुक आयोगाकडे संबधितांनी तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीची चौकशी विभागीय आयुक्ता त्यामुसार त्यांचे.निलबंन करण्यात आले येरंडी येथील 59 लोकांनी नमुना 6 मध्ये 7 फेबुवारी 2017 रोजी अर्ज करुनही विशिष्ट दिनांकापर्यंत  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून निर्णय न झाल्याने सदर यादीमध्ये त्या लोकांच्या नावाचा समावेश होऊ शकला नाही,याची गंभीर दखल राज्य निवडणुक आयोगाने घेत 29 सप्टेंबर 2017 रोजी येरंडी ग्रामपंचायतीची निवडणुक तत्काळ प्रभावाने रद्द केल्याने 16 आक्टोंबरला इतर ग्रामपंचायतीसोबत निवडणुक होऊ शकली नाही.त्यामुळे बोम्बार्डे हे दोषी असल्याने त्यांची तत्काळ निलबिंत करुन विभागीय चौकशी सुरु करण्याचे निर्देश 6 नोव्हेंबर 2017 च्या पत्रात राज्य निवडणुक आयोगाने दिले आहे.त्या पत्राच्या आधारावर गोंदिया जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्ताकंडे पत्र पाठवून निलबंन कारवाईबाबत माहिती दिली.