कातुर्लीच्या सरपंचपदी बिसेन तर उपसरपंचपदी दोनोडे

0
11

 गोंदिया,दि.12- नुकत्याच झालेल्या कातुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून केशरीचंद निवडून आले. त्यांचा पदग्रहण सोहळा काल शनिवारी (दि.11) आयोजित करण्यात आला होता.

 आज सरपंच बिसेन यांचे अध्यक्षतेखाली नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रथम सभेचे आयोजन करण्यात आले होते.  या पहिल्या सभेत नवीन उपसरंपच निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी तहसीलदारांनी नियुक्त केलेले अध्यासी अधिकारी कमलेश बिसेन यांनी काम पाहिले. यामध्ये रामलाल दोनोडे यांची उपसरपंचपदी वर्णी लागली.
यासभेनंतर ग्राम पंचायत पटांगणात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच यांचे पदग्रहणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. दरम्यान निर्वतमान सरपंच अमृता कोरे यांना शाल श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कटरे, ग्रामसेवक संघटनेचे विभागीय सचिव कमलेश बिसेन यांनी गाव विकासासाठी सर्वांच्या सहभागावर भर दिला. कार्यक्रमाच्या य़शस्वितेसाठी  नवनियुक्त सदस्य श्री चुंनीलालजी शहारे, भागवत बिसेन,रामटेके,कोरेताई, भेलावेताई,फरकुंडेटाई,जैतवरताई,शिवनकारताई,पोलीस पाटील भेलावे,प्रकाश कोरे,बुधराम कटरे, राजकुमार भेलावे, बबलू गौतम ,नितेमन बिसेन,हिरालाल बिसेन,भोंगडे यांनी सहकार्य केले.   संचालन हिरालाल यांनी तर आभार सचिव कमलेश बिसेन यांनी केले.