महामार्गाचा मोबदला देतांना भेदभाव-माजी मंत्री मोघे

0
7

यवतमाळ दि 12- संपूर्ण राज्यात जमीन अधिग्रहनाचा शासनाचा एकच नियम असताना एकाच महामार्गावर एका जिल्हात शेतकऱ्यांना वेगळा दर तर दुसऱ्या जिल्हात वेगळा दर दिला जात असून यात यवतमाळ जिल्हातील शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. वाढत्या शेतकरी आत्महत्या कीटकनाशकामुळे झालेले मृत्यू शेकडो बाधित बोण्डअळी मुळे उध्वस्त झालेली कापसाची पिके या मुळे शेतकरी हैराण असताना त्यांना मदत न करता आता त्यांच्या जमिनीचा मोबदला कमी देऊन पुन्हा त्यांच्या वर अन्याय शासन करीत असल्याचे मोघे म्हणाले. नागपूर तुळजापूर हा महामार्ग यवतमाळ जिल्यातून जातो कळंब यवतमाळ आर्णी महागाव व उमरखेड या 5तालुक्यातून170 किलोमीटर हा मार्ग जातो या तालुक्यातील रस्त्याच्या दोन्ही बाजूची जमीन शासन अधिग्रहित करीत आहे. मात्र मोबदला देताना यवतमाळ जिल्हातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर प्रमाणे मोबदला दिल्या जात आहे. तर याच महामार्गावर पुढे हिंगोली जिल्यातील कळमनुरी येथे जमिनीचा दर प्रति चौरस मीटर 1 हजार 150 रुपये देण्यात येत आहे. नांदेड जिल्हात ही चौरस मीटर प्रमाणे हाच दर जमिनीचा देण्यात येत आहे. मग यवतमाळ जिल्हातील शेतकऱ्यांना वेगळा नियम का असे मोघे म्हणाले. या बाबत उदाहरण देताना त्यांनी पुणे जिल्हातील नारायणगाव येथिल शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहित केलेल्या जमिनीचा सरसकट 1 हजार 333 प्रति चौरस मीटर प्रमाणे देण्यात आला तर याच शासनाने यवतमाळ जिल्हातील कळंब तालुक्यातील खुटाळा येथील एका शेतकऱ्याला प्रति हेक्टर 3 लाख 60 हजार मोबदला त्याच्या जमिनीचा देण्यात आला. जर दोघाना मिळालेल्या मोबदल्याची तुलना करता कळंब तालुक्यातील शेतकऱ्याला प्रति चौरस मीटर प्रमाणे फक्त 35 रुपये 5 पैसे दर मिळाला . नांदेड हिंगोली पुणें प्रमाणे प्रति चौरस मीटर प्रमाणे दिला असता तर त्याला 34 लाख 15 हजार 7 रूपये मिळाले असते. ही तफावत शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे याचा शासनाने विचार करण्याची गरज असल्याचे मोघे म्हणाले. मोघे यांनी केला जर या बाबत जर शेतकऱ्यावरील अन्याय दूर झाला नाहीतर कॉग्रेस शासनाच्या विरोधातशेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहून जिल्हात मोठे आंदोलन करेल असा इशारा मोघे यांनी दिला.